आढळराव- कोल्हे यांच्यात शाब्दिक चकमक शेवटच्या निवडणुकीवरून आरोपप्रत्यारोप

amol kolhe vs shivajirao adhalrao

पिंपरी : शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. ही निवडणूक कुणाची शेवटची यापेक्षा लोकशाहीसाठी महत्त्वाची असल्याचे म्हणत कोल्हे यांनी आढळराव यांना टोला लगाविला. तर, कोल्हेंमध्ये ह्यमीह्ण पणा ठासून भरल्याचा पलटवार आढळराव यांनी केला.

ही निवडणूक कुणाची शेवटची यापेक्षा देशासाठी, देशातील लोकशाहीसाठी महत्त्वाची आहे. राजकीय पक्षांची, लोकसभेची निवडणूक नाही तर ही जनतेची, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची निवडणूक आहे. जनतेनेच निवडणूक आपल्या हातात घेतली आहे. गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात झालेला बदल जनतेने अनुभवला असल्याचे कोल्हे म्हणाले.

मी कधी थांबायचे हा माझा प्रश्न आहे. मी थांबू नये, असा अमोल कोल्हेंचा आग्रह असेल तर आणखी चार निवडणूक लढवतो. कोल्हेंमध्ये ह्यमीह्ण पणा ठासून भरला आहे. अजित पवारांसह कोणावरही टीका करण्याचे त्यांचे काम सुरू आहे. हे निवडणूक हातातून निसटल्याचे चिन्ह असल्याचा पलटवार शिवाजी आढळराव यांनी केला.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.