भाजपचा तुम्हाला पाठिंबा आहे का? या प्रश्नावर चंद्रकांत खैरे हसत म्हणाले…

chandrakant khaire vs sandipan bhumre

राजेभाऊ मोगल | छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये वेगळीच रंगत बघायला मिळाली. तिरंगी होत असलेल्या निवडणुकीत महायुतीकडून मंत्री संदिपान भुमरे, महाविकास आघाडी कडून चंद्रकांत खैरे तर एमआयएमचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील रिंगणात आहेत.

मतदानाच्या वेळी भाजप आपल्याला मदत करतयं का? असं विचारलं असता चंद्रकांत खैरे हसत म्हणाले, शिस्तबद्ध पक्ष दारूवाल्याला, गद्दाराला मतदान करणार नाहीत. यावरून येथे नेमकं काय सुरुय, अशी चर्चा सुरू आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये मागील अनेक निवडणुकामध्ये “खान पाहिजे की बाण?” हाच प्रचाराचा मुद्दा असायचा. यावेळी मात्र वेगळे मुद्दे समोर आलेले आहेत. चंद्रकांत खैरे यांच्याकडून महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे दारू व्यवसाय करत असून तरुण पिढीला व्यसनाधीन करण्याच्या कामाला लागले असल्याची टीका केली.  तुम्ही अशा दारुवाल्याला मतदान करणार का? असा प्रचार खैरे यांनी केला.

दरम्यान काल “संदिपान भुमरे यांना भाजपचा मोठा झटका? जलील निवडून येणार असतील तर खैरेंना मदत?” अशा आशयाची बातमी ‘महाराष्ट्र देशा’ने प्रसिद्ध केली होती. त्यानंतर महायुतीमध्ये मोठी खळबळ उडाली. महायुतीच्या नेत्यांनी ‘महाराष्ट्र देशा’च्या विरोधात पोलिसात तक्रारी दाखल करत पत्रकारास जीवे मारण्याची धमकी दिली.

आज सोमवारी (ता.१३) प्रत्यक्षात मतदानाला सुरुवात झाल्यानंतर श्री शारदा मंदिर कन्या प्रशाला या ठिकाणी चंद्रकांत खैरे मतदानासाठी कुटुंबीयासह दाखल झाले. यावेळी त्यांना भाजप आपल्याला मदत करतयं का? असा प्रश्न विचारला असता ते हसत म्हणाले, शिस्तबद्ध पक्ष दारूवाल्याला, गद्दाराला मतदान करणार नाहीत. तसेच जनता माझ्या पाठीशी असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.

भाजपचा तुम्हाला पाठिंबा आहे का? खैरे म्हणाले शिस्तबद्ध पक्ष दारूवाल्याला, गद्दाराला मतदान नाही करणार

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.