Share

Maratha Reservation | भुजबळांच्या दबावामुळे राज्याचं शिष्टमंडळ झुकलं? जरांगगेंसोबत आज होणारी भेट ढकलली उद्यावर

Maratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, अशी मागणी मराठा समाजाने केली आहे. अशात मराठा समाजाच्या या मागणीला मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी विरोध दर्शवला आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणं म्हणजे मागील दाराने ओबीसीमध्ये प्रवेश देण्यासारखं आहे, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं. छगन भुजबळ यांच्या … Read more

Published On: 

Maratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, अशी मागणी मराठा समाजाने केली आहे.

अशात मराठा समाजाच्या या मागणीला मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी विरोध दर्शवला आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणं म्हणजे मागील दाराने ओबीसीमध्ये प्रवेश देण्यासारखं आहे, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं.

छगन भुजबळ यांच्या या वक्तव्यानंतर मराठा आंदोलन आक्रमक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी राज्य सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांची भेट घेणार होतं.

परंतु, आज होणारी ही भेट उद्यावर ढकलण्यात आली आहे. छगन भुजबळ यांच्या दबावामुळे राज्य सरकारने ही भेट रद्द केल्या असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहे.

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ आज मनोज जरांगे यांची भेट घेणार होतं. परंतु, त्यांनी ही भेट उद्या वर ढकलली आहे.

आज जम्मू-काश्मीर येथील कुपवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालं . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा अनावरण सोहळा पार पडला. त्यामुळे मनोज जरांगे आणि राज्य सरकारच्या शिष्टमंडळाची आज होणारी भेट उद्या होणार आहे.

Manoj Jarange started hunger strike for Maratha reservation

दरम्यान, राज्यात मराठा समाज आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून पेटून उठला आहे. मनोज जरांगे यांनी याच पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला सुरुवात केली.

त्यानंतर त्यांचं हे आंदोलन संपूर्ण राज्यात पसरलं. हे आंदोलन तीव्र होत असताना राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांना उपोषण स्थगित करण्याची विनंती केली.

त्यांच्या विनंतीचा मान राखत जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं. उपोषण मागे घेतलं असलं तरी आंदोलन सुरूच राहणार असल्याचं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही