Maratha Reservation | त्यांना काय करायचं ते करू द्या; गुणरत्न सदावर्ते यांच्या याचिकेवर जरांगेंची प्रतिक्रिया

Maratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा अत्यंत चर्चेत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी जालना जिल्ह्यात आंदोलन सुरू केलं.

त्यानंतर त्यांचं हे आंदोलन संपूर्ण राज्यात पसरताना दिसलं. मराठा समाजाच्या या आंदोलनाने हिंसक वळण घेतलं होतं. याच पार्श्वभूमीवर राज्यात जागोजागी दगडफेक, जाळपोळ, फोडाफोडी इत्यादी घटना घडताना दिसल्या.

या सर्व घटनांनंतर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आंदोलकांविरोधात उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. 8 तारखेला या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

मराठा आंदोलनाविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी याचिकेद्वारे केली आहे. याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Manoj Jarange commented on Gunaratna Sadavarte

गुणरत्न सदावर्ते यांनी केलेल्या याचिकेवर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे म्हणाले, “मराठा समाजाचं आरक्षणासाठी (Maratha Reservation) सुरू असलेलं आंदोलन शांततेत आहे.

कुणी काही केलं तरी काहीच विषय होणार नाही. मुख्य म्हणजे आम्हाला त्यांच्याबद्दल बोलायचं नाही. त्यांना काय करायचं आहे, ते करू द्या.

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सुरू असलेलं उपोषण मी स्थगित केलं आहे. त्यामुळे आता सगळं शांत झालं आहे. राज्यात आता आरक्षणासाठी (Maratha Reservation) फक्त साखळी उपोषण सुरू आहे.”

दरम्यान, मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित केल्यानंतर राज्य सरकारने या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी जरांगे यांच्याकडे 2 जानेवारीपर्यंत मुदत मागितली होती.

मात्र, मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला 2 जानेवारीपर्यंत मुदत देण्यास नकार दिला. मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर ठोस निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगे यांनी राज्य शासनाला 24 डिसेंबर पर्यंत वेळ दिला आहे. राज्य सरकारला 24 डिसेंबर पर्यंत मराठ्यांना आरक्षण द्यावं लागणार असल्याचं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.