निवडणूक आयोगाकडून अजित पवारांना ‘क्लीनचिट’

Ajit Pawar – इंदापूरमधील सभेत बोलताना अजित पवार यांनी विकास निधी हवा असेल तर उमेदवाराच्या चिन्हासमोरील ‘कचाकचा बटण दाबा’ अन्यथा विकासनिधी देताना आपला हात आखडेल असे वक्तव्य केल होते.

‘कचाकचा बटण दाबा’ यावर शरद पवार गटाकडून आक्षेप घेण्यात आला होता. व्यक्तव्याची तक्रार त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती.

प्राथमिक चौकशीत अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यात कोणत्याही उमेदवाराचे नाव किंवा पक्षाचे नाव घेतले नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे हा आचारसंहितेचा भंग ठरत नाही असे निवडणूक अधिकरी कविता द्विवेदी यांनी या बाबतचा अहवाल पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना सादर केला आहे.

अजित पवारांच्या कोणत्या व्यक्तव्यावर आक्षेप?

आम्ही केलेल्या कामाला तुम्हाला फायदा होईल, पण जेव्हा तुम्हाला फायदा होईल तेव्हा कुणामुळे फायदा झाला हे विसरू नका. विकासकामासाठी लागेल तेवढा निधी आम्ही देऊ. पण जस आम्ही पाहिजेल तेवढा निधी देतो, त्याप्रमाणे मशीनमध्ये देखील कचाकचा बटण दाबा. म्हणजे मला निधी द्यायला बरं वाटेल. नाहीतर माझा हात आखडता येईल, असे अजित पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.