अमोल कोल्हेंचा भुजबळांबाबत मोठा गौप्यस्फोट; छगन भुजबळ म्हणाले ओबीसी समाज…!

Amol kolhe VS Chhagan Bhujbal

Amol kolhe VS Chhagan Bhujbal : शिरूर लोकसभेसाठी शिंदे गटाकडून अमोल कोल्हे यांच्या विरोधात छगन भुजबळांना उमेदवारी देणार होते, असा दावा विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे.

कोल्हे म्हणाले, ‘माझ्या विरोधात छगन भुजबळांना (Chhagan Bhujbal) उमेदवारी देणार होते. मात्र, भुजबळांनी शिरुरमधून लढण्यास नकार दिला. त्यानंतर शिवाजीराव आढळराव पाटलांना उमेदवारी देण्यात आली असल्याचे कोल्हे म्हणाले.

जे उमेदवार बेडूक उड्या घेऊन आजवर ज्यांच्यावर आरोप करत होते, त्याच अजित पवारांच्या वळचणीला जाऊन बसलेत. त्यामुळं शिवाजीराव आढळराव पाटलांविषयी फार बोलणं उचित राहणार नाही. ते पहिल्या पसंतीचे उमेदवार असते तर नक्की मी आढळरावांवर भाष्य केलं असतं, असं म्हणत कोल्हेंनी आढळराव पाटलांची खिल्ली उडवली.

यावर छगन भुजबळांनी प्रतिक्रिया देत म्हणाले, ‘नाशिकमधून माझे नाव फायनल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला फोन करून शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढता का? अशी विचारणा केली होती. शिरूरमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर ओबीसी समाज असल्याचे भुजबळ म्हणाले.

पुढे बोलताना भुजबळ म्हणाले,’मी शिरूरमधून निवडणूक लढवली तर नाशिकची जागा त्यांना मिळाली असती, असा त्यामागे हेतू होता. मात्र मी नाशिक सोडून जायचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मागणीला नकार दिला, असे स्पष्टीकरण छगन भुजबळ यांनी दिले आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.