Sharad Pawar | शरद पवार घेणार जालन्यातील मराठा आंदोलकांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Sharad Pawar | मुंबई: जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या मराठा आंदोलनानं हिंसक वळण घेतलं आहे. या आंदोलनादरम्यान आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज केला असल्याचं बोललं जातं आहे.

या घटनेनंतर राज्याचं राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज जालना जिल्हा दौरा करणार आहे. या दौऱ्यादरम्यान शरद पवार आंदोलकांची भेट घेणार असल्याची माहिती मिळाली आहे.

The injured protesters are undergoing treatment in Ambad hospitals

जालना जिल्ह्यात घडलेल्या लाटीचार्जमध्ये अनेक आंदोलन आणि नागरिक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवरली सराटी या ठिकाणी ही घटना घडली आहे.

अंबड येथील रुग्णालयामध्ये या जखमी आंदोलकांवर उपचार सुरू आहे. शरद पवार (Sharad Pawar) या रुग्णालयात जाऊन जखमी आंदोलकांची भेट घेणार आहे.

जालना जिल्ह्यामध्ये घडलेल्या घटनेचे पडसाद संपूर्ण मराठवाड्यात दिसून आले आहे. या प्रकरणानंतर बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झालेली असून जिल्हा बंदीची मागणी केली जात आहे.

तर दुसरीकडे या घटनेमुळे सोलापूर-धुळे महामार्गावर 14 गाड्यांची जाळपोळ करण्यात आली आहे. या घटनेमध्ये आतापर्यंत 45 पोलीस जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवरली सराटी या गावामध्ये मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे यांच्यासह दहा लोक 29 ऑगस्टपासून आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाला बसले होते.

शांततेच्या मार्गानं उपोषण करत त्यांचं आंदोलन सुरू होतं. मात्र, मनोज जरांगे यांची तब्येत बिघडल्यामुळे मराठा आंदोलकांनी चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर शुक्रवारी या आंदोलनामध्ये पोलिसांनी हस्तक्षेप घ्यायला सुरुवात केली.

सुरुवातीला पोलिसांनी आंदोलकांशी चर्चा केली असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर लाठी चार्ज झाला असल्याचं बोललं जात आहे. या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.