मी जर कोणाला धमकावले असते तर बारामतीकर पाठीशी राहिलेच नसते – अजित पवार

ajit pawar baramati

बारामती : पाणी देण्यासाठी मी जर कोणाला धमकावले असते तर जनतेने मला इतक्या मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिलाच नसता, असे स्पष्ट करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना प्रत्युत्तर दिले.

संस्था चालविताना संस्थेच्या पद्धतीने चालवायची असते आणि राजकारण हे राजकारणाच्याच पद्धतीने करायचे असते. जर कोणी धमकावलेच असेल तर पोलिसांत तक्रार दाखल करावी, पोलीस त्या बाबतची कार्यवाही करतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

शरद पवार यांनी अजित पवार यांचे नाव न घेता दमबाजीला घाबरू नका, असे जाहीर सभेतून सांगितले होते. त्या बाबत विचारता अजित पवार यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

एकनाथ खडसे यांच्या भाजपच्या घरवापसीबाबत विचारले असता ते म्हणाले, प्रत्येकाने काय करावे हे ज्याच्या त्याचा अधिकार आहे, राजकारणात अशा घटना घडत असतात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यमातून प्रत्येकाला अधिकार दिला आहे.

संजय राऊत यांनी लोकसभेची लढाई नरेंद्र मोदी विरुध्द उध्दव ठाकरे केली आहे, यावर तुमचे काय मत विचारले असता, पवार मिश्किलपणे हसत म्हणाले की, ‘एक वेळ नरेंद्र मोदी विरुध्द राहुल गांधी अशी लढाई आहे असे मान्य करता आले असते, पण राऊत यांचा पक्ष महाराष्ट्राबाहेर नाही, त्या मुळे असे होणार नाही. लोकांना पटेल असे तरी त्यांनी बोलावे असा सल्लाही अजित पवार यांनी संजय राऊत यांना दिला.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.