वाह, लय भारी ! पुण्यातून आता आंतरराष्ट्रीय खेळाडू घडणार; मुरलीधर मोहोळांनी जागवले क्रीडानगरी बनविण्याचे स्वप्न

मुरलीधर मोहोळांनी पुणेकरांमध्ये जागवले क्रीडानगरी बनविण्याचे स्वप्न Murlidhar Mohol pune lok sabha

Murlidhar Mohol | पुणे : ‘खेळाडू हा कोणत्याही देशाचा कणा असतो. ज्या देशातील खेळाडू सशक्त आणि समाधानी, तो देश अधिकाअधिक प्रगती करू शकतो, नेमका हेच विश्वास स्वतःमध्ये जागवून पुण्याला क्रीडा नगरी बनवून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविण्याचे पुणे लोकसभेचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी स्वप्न पाहिले आहे. देशभरात क्रीडा क्षेत्रासाठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी ‘खेलो इंडिया’च्या माध्यमातून विविध क्रीडा प्रकारांना उपलब्ध करुन दिलेले व्यासपीठ हे आंतराष्ट्रीय स्पर्धांसाठी मैलाचा दगड ठरले आहे.

त्याच पार्श्वभूमीवर पुणे शहरातही विविध क्रीडा प्रकारांसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध करुन पुण्याला क्रीडानगरी करण्याचे ध्येय आपण लवकरच गाठणार असून पुण्यातून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्याला प्राधान्य असेल, असा विश्वास महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना नुकताच व्यक्त केला आहे.

पुण्याच्या क्रीडा क्षेत्राचे भविष्य कसे असावे, याबद्दल चर्चा करण्यासाठी पुणे स्पोर्ट्स असोसिएशन आणि सर्व फिटनेसप्रेमी पुणेकरांतर्फे विशेष ‘पुणे स्पोर्ट्स कॉन्क्लेव्ह’ नुकतेच पार पडले. याप्रसंगी मोहोळ यांनी पुणेकरांमध्ये हाच विश्वास जागवला आहे. विशेष म्हणजे ‘खेळाडू म्हणून स्वत:ला घडविण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात, मेहनत घ्यावी लागते. या दरम्यान, अनेक अडचणी येतात. या अडचणींवर मात करण्यासाठी आता मुरलीधर मोहोळ स्वतः लक्ष घालणार आहे. त्यामुळे आता खेळाडूंचा आंतरराष्ट्रीय मार्ग खुला होणार आहे.

‘पुण्याने राज्याला आणि देशालाही अनेक खेळाडू आजवर दिले आहेत. ज्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पुण्याचे नाव मोठे केले अशा खेळाडूंचे मार्गदर्शन घेत पुण्याची क्रीडा संस्कृती आणखी जोमाने पुढे नेण्याचाही आमचा प्रयत्न असणार होऊ शकतो.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.