पुण्यात ‘मुळशी पॅटर्न’ नव्हे तर ‘कायद्याचा पॅटर्न’; पोलीस आयुक्तांचा गुंडांना इशारा

Commissioner of Police Amitesh Kumar

Amitesh Kumar पुणे : शहरात गेल्या आठवड्यात सलग चार गोळीबाराच्या घटना घडल्या. मुळशी पॅटर्न चित्रपटातील दृश्याप्रमाणे पुण्यात गोळीबाराच्या घटना घडल्यानंतर गुन्हे शाखेने गुंडांची झाडाझडती घेणयास सुरू केली. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुण्यात मुळशी पॅटर्न नव्हे तर कायद्याचा पॅटर्न चालणार, असा इशारा गुंडांना दिला.

गोळीबार आणि वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गुंडांची झाडाझडती घेण्यास सुरुवात केली. महिनाभरात बेकायदा पिस्तुले बाळगल्याप्रकरणी २८ जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ४२ पिस्तुले आणि ७४ काडतुसे जप्त करण्यात आली. पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्तांनी पुण्यात फक्त कायद्याचा पॅटर्न चालणार असल्याचे सांगितले.

गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त अमोल झेंडे उपस्थित होते. गुंडांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. खून, खुनाचा प्रयत्न, तडीपार, मोक्का कायद्यान्वये कारवाईत जामीन मिळवलेल्या सराइतांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.