Manoj Jarange | मराठा आरक्षणावर कोणी बोलत असेल तर सोडणार नाही; मनोज जरांगेंनी छगन भुजबळांना धारेवर धरलं

Manoj Jarange | छत्रपती संभाजीनगर: गेल्या महिन्यापासून मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरून अत्यंत आक्रमक झाला आहे. सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावं, अशी मागणी मराठा समाजाने केली आहे.

यासाठी मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला सुरुवात केली. तब्बल नऊ दिवस उपोषण केल्यानंतर राज्य शासनाने केलेल्या विनंतीवरून त्यांनी त्यांचं उपोषण स्थगित केलं.

त्यानंतर मनोज जरांगे यांनी राज्य शासनाला या मुद्द्यावर ठोस निर्णय घेण्यासाठी 24 डिसेंबर पर्यंत मुदत दिली आहे. अशात कुणबी प्रमाणपत्र वाटपावरून मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांना धारेवर धरलं आहे.

Manoj Jarange commented on Chhagan Bhujbal

छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असताना अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी कुणबी प्रमाणपत्र वाटपावरून तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

त्यांच्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर प्रतिक्रिया देत असताना मनोज जरांगे (Manoj Jarang) यांनी त्यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे.

मनोज जरांगे म्हणाले, “छगन भुजबळ यांना भेटण्याचा काही संबंध नाही. आरक्षणावर कोणी बोलत असेल तर त्यांना आम्ही सोडणार नाही. मी काही बोलत नाही याचा अर्थ असा नाही की मी काहीच बोलणार नाही.”

Chhagan Bhujbal commented on Maratha Reservation

दरम्यान, छगन भुजबळ यांनी कुणबी प्रमाणपत्र वाटपावरून नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “ज्यांची आधीपासून कुणबी नोंद असेल त्यांना प्रमाणपत्र देण्यास हरकत नाही. परंतु, संपूर्ण राज्याला प्रमाणपत्र वाटप करू नये.

पुढच्या दरवाजातून एंट्री मिळत नाहीये म्हणून तुम्ही मागच्या दाराने घुसण्याचा प्रयत्न करत आहात. आरक्षण हा गरिबी हटवण्याचा कार्यक्रम नाही.

आरक्षण समानता निर्माण करण्यासाठी आहे. आमचा मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही. आमचा सरसकट ओबीसीतून आरक्षण द्यायला विरोध आहे. त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.