पत्रकारांस जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या भाजप नेत्यांवर गुन्हा दाखल

Case registered against BJP leaders who threatened to kill journalists

छत्रपती संभाजीनगर : आमच्या विरोधात बातमी का लावलीस असे म्हणत ‘महाराष्ट्र देशा’ या नामांकित न्यूज पोर्टलच्या पत्रकारास जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या भाजपच्या तीन नेत्यांवर पुणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जनतेचा कौल लक्षात घेऊन तसेच जनतेसोबत बोलून विशेष म्हणजे भाजपच्या अंतर्गत गोटात काय हालचाली आहेत, हे जाणून घेत १२ मे २०२४ रोजी महाराष्ट्र देशा या वेब न्यूज पोर्टलवरसंदीपान भुमरेंना मोठा झटका? जलील निवडून येणार असेल तर खैरेंना मदत‘?

या आशयाखाली बातमी प्रसिद्ध करण्यात आली. ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर महायुतीमध्ये खळबळ माजली. वास्तव समोर आणल्याने भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, भाजपा अनुसूचित मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस जालिंदर शेंडगे, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल मकरिये आदींनी फोनकरून आमच्या विरोधात बातमी लावतो का? असे म्हणत ‘महाराष्ट्र देशा’च्या पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी दिली. यामागे मोठे षडयंत्र असल्याचे पत्रकारांनी सांगितले.

सदरिल व्यक्तीपासून माझ्या जीवितास धोका आहे, अशी तक्रार पत्रकाराने पुणे येथील हिंजवडी पोलीस ठाणे, पिंपरी चिंचवड मध्ये भादंवी कलम ५०७ प्रमाणे वरती नमूद तिन्ही नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणाची तक्रार केंद्रीय निवडणूक आयोग, दिल्ली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषद, विरोधीपक्षनेते अंबादास दानवे, विजय वडेट्टीवार यांच्याकडेही पाठविण्यात आले आहे.

भाजपचा तुम्हाला पाठिंबा आहे का? खैरे म्हणाले शिस्तबद्ध पक्ष दारूवाल्याला, गद्दाराला मतदान नाही करणार

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.