मला दिल्लीला जायचे, कारण संविधान बदलाचे; असे पंकजा मुंडे सांगतात, मोठ्या नेत्याचा गौप्यस्फोट

मला दिल्लीला जायचे कारण संविधान बदलाचे; असे पंकजा मुंडे सांगत असल्याचे मोठ्या नेत्याचा दावा

Jayant Patil Vs Pankja Munde | सातारा । महाविकास आघाडीची सातारा येथे आज धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा झाली. सभेला शरद पवार, जयंत पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांची उपस्थिती होती. देशात ११ उमेदवारांनी, खासदार असणाऱ्या लोकांनी संविधान बदलण्याची भाषणे करत असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले आहे.

बीडच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनीही संविधान बदलण्यासाठी दिल्लीला जायचे असल्याचे म्हंटले असल्याचा दावा, शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी केला आहे.

जयंत पाटील नेमके काय म्हणाले

आज या देशामध्ये ४०० पार आम्हाला करा म्हणजे आम्ही भारताचे संविधान बदलतो, असे एक नाही ११ जणांनी भारतातील भाजपच्या उमेदवारांनी, खासदार असणाऱ्या लोकांनी भाषणे करून सांगितले आहे. आमच्या बीडच्या पंकजा ताई यांनीही सांगितले, मला दिल्लीला जायचे कारण संविधान बदलाचे आहे. आज देशामध्ये यांचा संविधान बदलण्याचा संकल्प आहे. आजचे संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान बरे वाटत नाही का? असा सवाल करत जयंत पाटील यांनी भाजपला धारेवर धरले.

मराठा आरक्षणावर पंकजा मुंडे यांचे व्यक्तव्य 

उपोषण करून कुणाला आरक्षण मिळत नसतं. त्यासाठी विधानसभा, संसदेत कायदा करावा लागतो. त्यासाठी निवडून आलेल्या लोकांना आरक्षणाचा प्रश्न सोडवता येतो. उपोषण केल्याने त्याचा काही फायदा होत नाही.

पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षणासंबंधी (Maratha Reservation) वक्तव्य केल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाल्या नंतर आपण मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली नसल्याचे स्पष्टीकरण पंकजा मुंडे यांनी दिल आहे.

भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे म्हणाल्या की,  ”मी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली नाही, आणि जर टीका केली तर कधीच शब्द मागे घेत नाही, मी गोपीनाथ मुंडेंची औलाद आहे,” असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

बीड लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या पंकजा मुंडे विरुद्ध महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे अशी लढत होत आहे.

Jayant Patil Vs Pankja Munde Constitutional Amendment

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.