Chandrashekhar Bawankule | विलासराव देशमुखांचे चिरंजीव अमित भाजपात प्रवेश करणार?; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले…
Chandrashekhar Bawankule | औरंगाबाद : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत फूट पडली आणि सहा महिन्यांपूर्वी महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि भाजपाने एकत्र सत्ता स्थापन केली. तेव्हापासून महाराष्ट्रातील राजकारणात काँग्रेसचे आमदार अमित देशमुख (Amit Deshmukh) आणि आमदार धीरज देशमुख हे भाजपात जाणार असल्याची चर्चा सुरु आहे.
त्यातच भर म्हणजे ‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रात आल्यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अशोक चव्हाण आणि अमित देशमुख यांच्याबद्दल विधान केलं. “काँग्रेसचे आता काहीच शिल्लक राहिलेलं नाही. लातूरकर आणि नांदेडकर कधीही फडवणवीसांच्या मांडीवर जाऊन बसतील,” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले होते.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज औरंगाबाद दौऱ्यावर असताना अमित देशमुखांच्या चर्चांवर मोठं विधान केलं. येत्या काही काळात भाजपात अनेक दिग्गज नेते प्रवेश करणार आहेत. लवकरच हे बॉम्बस्फोट होतील, असं भाकीत बावनकुळे यांनी केलं.
“शिवसेनेचे अनेक लोक एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. ही सगळी लोक भाजपामध्ये येतील यात बरीच मोठे मोठी नावं आहेत. फक्त वेळ आणि ठिकाण ठरवायचं आहे”, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. या संदर्भात पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Prakash Ambedkar | “भाजपासोबत गेलो असतो तर काँग्रेस , राष्ट्रवादीचा खिमा केला असता” – प्रकाश आंबेडकर
- Skin Care | हिवाळ्यामध्ये त्वचा चमकदार आणि मुलायम ठेवण्यासाठी करा ‘या’ गोष्टींचा वापर
- Sanjay Raut | “पंतप्रधान नरेंद्र मोदी आपलेच आहेत, ते कधीही येतील, पण गुंतवणूक…”; संजय राऊतांचा खोचक टोला
- Job Alert | न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू
- Prakash Ambedkar | एकनाथ शिंदेंसोबतच्या बैठकीनंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान; म्हणाले, “ठाकरेंसोबतच्या युतीत…”