Sanjay Raut | सरकारनं जालना जिल्ह्यात लाठी चार्ज घडवून आणला – संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई: जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी चार दिवसांपासून आंदोलन सुरू होतं. या आंदोलनादरम्यान एक धक्कादायक प्रकार घडला असल्याचं दिसून आलं आहे.

या आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमचं सरकार असताना लाठी चार्ज कधीच झाले नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

आज सकाळी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिले आहे. दोशींवर कारवाई केली जाईल असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

मात्र, या घटनेमध्ये स्वतः सरकारच दोषी आहे. राज्य सध्या कुणाचं आहे? राज्याचं गृहखात कोण सांभाळत आहे? आमचं सरकार असताना अशा प्रकारचे अनेक मोर्चे निघाले होते. मात्र, त्यावेळी पोलिसांनी लाठी चार्ज केला नाही.

जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या आंदोलनामध्ये लाठीचार्ज करण्यामागे एक राजकीय सूत्रता आहे. मुंबईमध्ये विरोधकांच्या इंडिया आघाडीची बैठक सुरू होती.

देशातील आणि राज्यातील जनतेचं लक्ष या बैठकीकडं होतं. या बैठकीवरून लक्ष हटवण्यासाठी जालन्यामध्ये आंदोलकांवरती हल्ला करण्यात आला आहे.”

The government has brought this lathi charge to create tension in the state – Sanjay Raut

पुढे बोलताना ते (Sanjay Raut) म्हणाले, “मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत अनेक मोर्चे झाले आहे. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं आणि शांततेनं आतापर्यंत मराठा समाजाचे मोर्चा झाले आहे.

या मोर्चामध्ये मराठा समाजानं कधी कायदा आणि सुव्यवस्थेचं उल्लंघन केलं नाही. अशात जाणीवपूर्वक लाठीचार्ज करून महाराष्ट्रात तणाव निर्माण करायचा आणि त्या तणावाच्या माध्यमातून मुंबईत चाललेल्या इंडियाच्या बैठकीवरून लक्ष हटवायचं.

यासाठी सरकारनं पूर्ण नियोजन पद्धतीने हा लाठी चार्ज घडवून आणला आहे. सध्याचं सरकार वैफल्य आहे. या हल्ल्याच्या माध्यमातून राज्य सरकारनं त्यांची अस्वस्थता बाहेर काढली आहे.

या सरकारला संयम राखता आला असता. मात्र, राज्यामध्ये तणाव निर्माण करण्यासाठी त्यांनी हा लाठी चार्ज घडवून आणला आहे. निवडणुकांच्या आधी देशात आणि राज्यात दंगली घडवून आणल्या जातील, असं आम्ही सातत्यानं सांगत आहोत आणि त्याचा हा पहिला पुरावा आहे.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.