Pankaja Mundhe | BJP मध्ये संधी का मिळत नाही? पंकजा मुंडे म्हणतात…

Pankaja Mundhe | नाशिक: नाशिकच्या व्ही प्रोफेशनल संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना करिअर विषयी मार्गदर्शन मिळावे यासाठी विशेष चर्चा सत्र आयोजित करण्यात आलं होतं. या चर्चासत्रामध्ये अनेक तज्ञांनी आणि मान्यवरांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमामध्ये भाजपा (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Mundhe) पंकजा मुंडे यांची मुलाखत झाली. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.

नाशिकमध्ये झालेल्या मुलाखतीमध्ये भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. भाजपामध्ये तुम्हाला संधी का मिळत नाही? असा प्रश्न पंकजा मुंडे यांना विचारण्यात आला होता. या प्रश्नाच्या उत्तरावर त्या म्हणाल्या, “मला संधी का मिळत नाही याचे उत्तर मला संधी न देणाऱ्यांनाच विचारा. कारण ज्यांनी मला संधी दिली नाही या प्रश्नाचे उत्तर तेच देऊ शकतात. मी या प्रश्नाचं काहीच उत्तर देऊ शकत नाही.”

मनात ज्या गोष्टी बाळगून मी राजकारणात आले, त्या समाजासाठी काम करण्याची मुभा जर मला नसेल तर राजकारण मला शक्य होणार नाही, असं देखील त्या म्हणाल्या आहे. खऱ्या विषयांकडे आपलं लक्ष केंद्रित करा. खऱ्या विषयांकडे फोकस करा. दिवसेंदिवस विविध क्षेत्रातील पातळी घसरत चालली आहे. सोशल मीडियामुळे नको त्या विषयांकडे लक्ष जात आहे, असं त्या या मुलाखतीमध्ये बोलताना म्हणाल्या.

एखाद्या नेत्यानी दुसऱ्या पक्षाच्या नेत्यासोबत गाडीत बसणं त्यांच्याशी बोलणं किंवा त्यांच्या समारंभात जाणं या गोष्टींचा कोणताही अर्थ लावण्याची काहीच गरज नाही. त्याचबरोबर राजकारणामध्ये कुणी कुणावर वैयक्तिक आरोप करू नये, असं म्हणत त्यांनी स्पष्टपणे आपलं मत मांडलं.

महत्वाच्या बातम्या

 

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.