Sanjay Raut | राज्य अनाडी लोकांच्या हाती गेलंय; ग्रामपंचायत निवडणुका निकालावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

Sanjay Raut | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने मुंबई विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघाच्या सिनेट निवडणुका रद्द केल्या होत्या.

अशात काल (06 नोव्हेंबर) राज्यातील दोन हजाराहून अधिक ग्रामपंचायतीचा कौल जाहीर करण्यात आला. ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालात भारतीय जनता पक्ष हाच नंबर वन पक्ष ठरला आहे.

त्याचबरोबर या निवडणूक निकालांमध्ये महायुतीची सरशी झाली आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर खोचक शब्द टीका केली आहे. राज्य अनाडी लोकांच्या हाती गेले असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Times have been hard – Sanjay Raut

ट्विट करत संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “काळ मोठा कठीण आला आहे. राज्य अनाडी लोकांच्या हाती गेले आहे. ग्राम पंचायत निवडणुका आम्हीच जिंकल्याचा दावा बरेच गटतट करीत आहेत.

या निवडणुका पॅनल पद्धतीने लढवल्या जातात. पक्ष आणि चिन्हावर लढवल्या जात नाहीत. त्यामुळे आम्हीच जिंकलो हा दावा पोकळ आहे.

जे लोक विद्यापीठाच्या सेनेट निवडणुका घेण्यास घाबरतात.मुंबई सह 14 महानगर पालिकांच्या निवडणुका घ्यायला यांची हातभर फाटते. ते ग्राम पंचायत निवडणुका आम्हीच जिंकल्याचा गुलाल उधळत आहेत. याला काय म्हणावं? हास्य जत्राच!”

दरम्यान, राज्यामध्ये यांना पुरेसा पाऊस न झाल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटानं आजचा सामना अग्रलेखाच्या माध्यमातून राज्य सरकारवर टीका केली आहे.

नव्याने काही तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्याचे ‘लॉलीपॉप’ राज्य सरकारने दाखविले आहे. मात्र ते तालुके आणि विभाग कोणते याचा तपशील अद्यापि गुलदस्त्यात आहे.

मिथे सरकारने हा ‘गुलदस्ता’ सत्ताधारी आमदारांना देण्यासाठी दडवून ठेवला आहे का? विकास निधीपासून विकास कामांपर्यंत हे सरकार राजकारणच करीत आहे. दुष्काळासारखा जीवनमरणाचा विषय तरी त्यातून वगळा!

चांदवड तालुक्यात तीन दिवसांत दुष्काळात होरपळणाऱ्या दोन शेतकऱ्यांनी मृत्युला जवळ केले. त्याची तरी चाड बाळगा. मात्र ते सोडून मिंधे सरकार दुष्काळाचीही जुमलेबाजी करीत आहे, असं आजच्या सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.